सोलापूर :
प्राध्यापकांप्रमाणे भारतातील विद्यापीठ व महाविद्यालतीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कक्षेत आणा, अशी मागणी केंद्र शासनाकडे याअगोदरच केली आहे. ही मागणी केंद्र शासनाने मान्य केली नाही तर भारतातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेत्तर कर्मचारी आंदोलन करतील, असा इशारा अखिल भारतीय विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह यांनी केंद्र शासनाला दिला आहे.
येथील शिवस्मारक सभागृहात विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे. त्यासही आमचा विरोध आहे, असे सांगून ते म्हणाले, परदेशातील विद्यापीठे देशात आण्यासही आमचा विरोध असेल. सहा राज्याने जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केली आहे. सर्व राज्यात जुनी पेन्शन सुरू करण्यासाठी आमचा लढा सुरू राहील.