रेल्वे कारखान्यात नवीन एलएचबी बोगीसाठी ५१० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करावा, गेट नंबर-३८ मध्ये भुयारी मार्ग न करता, उड्डाणपूल तयार करावा, कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याला कायमस्वरूपी काम मिळावे, सर्वाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे चिंकहिल आरपीएफ ट्रेनिंग सेंटर हे नाशिक येथे हलविण्यात आले आहे ते परत यावे, याबरोबरच रेल्वे कारखान्यात भरण्यात येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गात स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे,असे प्रश्न अनेक वर्षांपासून रेल्वे बोर्डाकडे प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी महेंद्र जगताप, चंद्रकांत वाघमारे, सतीश जगताप यांनी नुकतेच दिल्लीत जाऊन पाठपुरावा केला आहे.
................................
उड्डाणपूल न केल्यास आंदोलन
आरपीआयच्या वतीने येथील गेट क्रमांक ३८ वर उड्डाणपूल उभारावा म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केलेला आहे. उड्डाणपूल न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आरपीआयचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेंडगे यांनी दिलेला आहेत.