सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढविणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीला विरोध नको म्हणून बसपातर्फे उमेदवारी दाखल केलेले राहुल सरवदे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेतला.बसपातर्फे राहुल सरवदे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळेस प्रथमच वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून उमेदवारी दाखल केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणून प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढवित असल्याने त्यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करू नये, अशी भूमिका बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी घेतली होती. शुक्रवारी उमेदवारी माघार घेण्याचा दिवस होता.दुपारी सरवदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी माघार घेतली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आतापर्यंत मागासवर्गीय समाज हा काँग्रेस व भाजपा यांच्या पाठीमागे जात होता़ पण यावेळेस प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे पहिल्यांदाच सर्वजण संघटित झाले आहेत़ त्यामुळे आम्ही कशाला विरोध करायचा म्हणून बसपाकडून दाखल केलेली उमेदवारी मागे घेत आहे.गट-तट येत आहेत एकत्रभीमसैनिकांची बुधवारपेठेतील अस्थिविहाराजवळ बैठक झाली. सर्व गटतट विसरून निळ्या निशाणाखाली एक होण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोलापूरमध्ये बसपची माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 1:09 AM