सोलापूर - बहुजन समाज पार्टी सोलापूर कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याचे प्रदेश महासचिव प्रशांत लोकरे यांनी सोमवारी जाहीर केले. लवकरच कार्यकारणी जाहीर होईल असे ते म्हणाले.
महापालिकेच्या राजकारणात बहुजन समाज पक्षाचा स्वतंत्र गट कार्यरत होता. महापालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, ज्योती बमगोंडे, स्वाती आवळे असे एकूण चार सदस्य निवडून आले होते. लोकसभा निवडणूक पक्षात फूट पडली. चारही नगरसेवकांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे काम सुरू केले.
लोकसभा निवडणुकीनंतर एक नगरसेविका वंचित बहुजन आघाडीपासून बाजूला झाल्या. आता त्या भाजपमध्ये सक्रिय असून उर्वरित दोन नगरसेवक आणि एक नगरसेविका वेगवेगळ्या पक्षातून मोर्चेबांधणी करत आहे. पक्ष संघटने एक वाक्यता नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. यादरम्यान प्रदेश महासचिवांनी कार्यकारणी बरखास्त केल्याचे जाहीर केले. महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करण्या साठी सेक्टर बुथ बांधणी करू. त्यानंतर नवीन शहर कार्यकारणी जाहीर करू असे लोकरे म्हणाले.