पंढरपूर नगर परिषदेने ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनस्तरावर पत्रव्यवहार करून प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावित बुद्धभूमीवर आठवले यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या.
पंढरपूर येथे बुद्धविहार तयार झाल्यास येथे अनेक पर्यटक येतील. पर्यटन विकासातून स्थानिकांना विविध व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा हेतू साध्य करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आठवले म्हणाले.
यावेळी रिपाइंचे प्रदेश संघटन सचिव सुनील सर्वगोड, प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे, महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. कीर्तिपाल सर्वगोड, सम्यक क्रांती मंचचे संस्थापक सिद्धार्थ जाधव, प्रदेशाध्यक्ष प्रशांत लोंढे, सरचिटणीस रवी सर्वगोड, सहसचिव स्वप्नील गायकवाड, खजिनदार रवींद्रम शेवडे, प्रवीण माने, नगरसेवक महादेव भालेराव, माजी नगराध्यक्षा उज्ज्वला भालेराव, माजी नगराध्यक्ष, लक्ष्मण शिरसट, माजी नगरसेवक अंबादास धोत्रे, ओबीसी नेते अण्णा जाधव, तसेच रिपाइंचे जितेंद्र बनसोडे, संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते
----
महाबोधी बोधी वृक्षाचे रोपण
सम्राट अशोकाची कन्या संघमित्रा यांनी श्रीलंकेत रोपलेल्या महाबोधी वृक्षापासून अभिवृद्धीत केलेल्या बोधीवृक्षाच्या बीजरोपणातून अंकुरित बोधीवृक्षाचे रोपण रामदासजी आठवले यांचे हस्ते करण्यात आले.
----महाबोधी बोधिवृक्षाचे रोपण करताना रामदास आठवले, सुनील सर्वगोड, राजा सरवदे, ॲड. कीर्तिपाल सर्वगोड, सिद्धार्थ जाधव, प्रशांत लोंढे, रवी सर्वगोड.
----