राकेश कदम सोलापूर दि १३ : सोलापूर-विजापूर राष्टÑीय महामार्ग क्र. १३ च्या चौपदरीकरणाची १५७६ कोटी रुपयांची निविदा नुकतीच आयजेएम कंपनीने घेतली आहे. सध्या महामार्ग प्राधिकरण आणि कंपनीमध्ये करार प्रक्रिया सुरू आहे. आजवर दोन वेळा दोन कंपन्यांनी या महामार्गाचे काम घेऊन सोडले होते. या काळात या कामाची किंमत ५२८ कोटींनी वाढली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर हे पैसे टोलद्वारे वाहनधारकांच्या खिशातूनच वसूल होणार आहेत. २०११ पासून सोलापूर-विजापूर या ११० किमी महामार्गाच्या चौपदरीकरणाची चर्चा आहे. याचदरम्यान सुरू झालेले सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद चौपदरीकरणाचे काम निम्म्यापेक्षा जास्त पूर्ण झाले आहे. २०१२ मध्ये पहिली निविदा काढण्यापूर्वीच सर्व तांत्रिक गोष्टींची पूर्तता करणे अपेक्षित होते. या कामांतर्गत बाळे ते हत्तूर या दरम्यान २१ किमी बायपास होणार आहे. यातील काही जमीन माळढोक अभयारण्य परिक्षेत्रात येते. वन्यजीव विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र येण्यास वेळ लागला. त्यामुळे दीड वर्षानंतर ठेकेदाराने काम सोडून दिले. आता तिसरी निविदा नुकतीच मंजूर झाली आहे. हा करार मार्चअखेर पूर्ण होेण्याची शक्यता आहे. -------------------------या अशा तीन तºहा - मे २०१२ रोजी सद्भाव इंजिनिअरिंग प्रा.लि.ने १०४८ कोटी रुपयांना निविदा घेतली. बायपाससाठी वन्यजीव विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र येण्यास वेळ लागला. त्यामुळे २१ आॅक्टोबर २०१३ रोजी सद्भावने काम सोडून दिले. - महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा ३० जुलैै २०१४ रोजी दुसरी निविदा काढली. २० मार्च २०१५ रोजी युनिक्वेस्ट इन्फ्रा कंपनीची १३७७.५४ कोटींची निविदा मंजूर करण्यात आली. काही दिवसातच कंपनीला हे काम परवडत नसल्याची उपरती झाली. त्यामुळे त्यांनीही माघार घेतली. ५ नोव्हेंबर २०१५ ला महामार्ग प्राधिकरणाने या कंपनीसोबत करार रद्द करून बँक गॅरंटी जप्त केली. - २१ जुलैै २०१७ रोजी तिसरी निविदा काढण्यात आली. १६ नोव्हेंबर २०१७ रोजी हैदराबाद येथील आयजेएम कंपनीची निविदा मंजूर झाली. या कंपनीने १५७६.७९ कोटी रुपयांना हे काम घेतले आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि आयजेएममध्ये सध्या करार प्रक्रिया सुरू आहे. मार्च २०१८ अखेर करार प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे अधिकारी सांगत आहेत. -----------------सोलापूर-विजापूर चौपदरीकरणाच्या कामात काही बदल करण्यात आले आहेत. टाकळी येथील भीमा नदीवरील पूल पूर्वी आहे तोच ठेवण्यात येणार होता. आता त्याजागी नवे दोन पूल होतील. अशा प्रकारे अनेक कामात बदल केलेले आहेत. त्यामुळे या कामाची किंमत ५२८ कोटी रुपयांनी वाढली आहे. मार्चअखेर निविदा करार पूर्ण होतील. त्यानंतर कामालाही सुरुवात होईल. - वसंत पंधारकर, उपमहाव्यवस्थापक, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण.
सोलापूर-विजापूर चौपदरीकरणाचे बजेट ५२८ कोटींनी वाढले, दोनदा कंत्राटदारांची माघार, आता तिसºयांदा कराराच्या प्रतीक्षेत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 3:35 PM
सोलापूर-विजापूर राष्टÑीय महामार्ग क्र. १३ च्या चौपदरीकरणाची १५७६ कोटी रुपयांची निविदा नुकतीच आयजेएम कंपनीने घेतली आहे.
ठळक मुद्देकाम पूर्ण झाल्यानंतर हे पैसे टोलद्वारे वाहनधारकांच्या खिशातूनच वसूल होणारआजवर दोन वेळा दोन कंपन्यांनी या महामार्गाचे काम घेऊन सोडले सोलापूर-विजापूर या ११० किमी महामार्गाच्या चौपदरीकरणाची चर्चाटाकळी येथील भीमा नदीवरील पूल पूर्वी आहे तोच ठेवण्यात येणार