सोलापूर : नवीन विद्यापीठ कायदा-२०१६ नुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या निवडणुका होणार आहेत़ सोलापूर विद्यापीठाने मंगळवारी सायंकाळी निवडणूक कार्यक्रमाची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली़ निवडणुकीच्या प्रक्रियेला २६ आॅगस्टपासून सुरुवात होणार आहे़ विद्यापीठ संलग्नित ९२ महाविद्यालयात निवडणुका होणार आहेत.
सोलापूर विद्यापीठाच्या ९२ संलग्नित महाविद्यालयांतून एक अध्यक्ष, सेक्रेटरी, महिला प्रतिनिधी, आरक्षित सदस्य यांची निवडणुकीद्वारे निवड होणार आहे़ निवडून आलेले सदस्य हे विद्यापीठ स्टुडंट असोसिएशनचे म्हणजेच विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे सदस्य असणार आहेत़ याचसोबत प्रत्येक महाविद्यालयातील विभागानुसार प्रत्येक वर्गातून एका वर्गप्रतिनिधीची निवडणुकीद्वारे निवड होणार आहे.
विद्यापीठ स्टुडंट असोसिएशनचे सदस्य हे विद्यापीठ स्तरावरील अध्यक्ष, सेक्रेटरी, महिला प्रतिनिधी आणि आरक्षित सदस्यांसाठी मतदान करून त्यांची निवड करतील़ यानंतर ९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होणार आहेत़ या सर्व निवडणुकीसाठी २५ वर्षांखालील, सोमवार २६ आॅगस्ट २०१९ पर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच निवडणूक लढवता अथवा निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे.
असा आहे महाविद्यालय स्तरावरील निवडणुकीचा कार्यक्रम - मतदारांची पहिली यादी २७ आॅगस्टला जाहीर होणार - त्रुटी किंवा प्रश्न २८ आॅगस्ट - प्रश्नांचे निराकरण २९ आॅगस्ट - अंतिम मतदारांची यादी ३० आॅगस्ट - अर्ज स्वीकारणे ३१ आॅगस्ट - छाननी ३१ आॅगस्ट - अपील ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत (यानंतर सर्व निवडणूक उमेदवारांची लिस्ट नोटीस बोर्डावर लावण्यात येणार आहे.)- अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ सप्टेंबर - सर्व उमेदवार आणि प्राचार्य नियुक्तांची यादी ४ सप्टेंबर - प्रत्यक्ष निवडणूक ७ सप्टेंबर रोजी स़८ ते १२ पर्यंत -मतमोजणी व निवड ७ सप्टेंबर (प्रथम वर्ग प्रतिनिधी, नंतर इतर उमेदवारांची मतमोजणी) - प्राचार्य नियुक्त उमेदवारांची शिफारस ९ सप्टेंबर - उमेदवारांनी खर्च सादर करण्याची अंतिम तारीख २३ सप्टेंबर दुपारी ३ पर्यंत.
विद्यापीठ विद्यार्थी कौन्सिल निवडणूक कार्यक्रम- विद्यापीठ विद्यार्थी असोसिएशन स्थापना ९ सप्टेंबर - अर्ज दाखल करणे ११ सप्टेंबर - छाननी करणे ११ सप्टेंबर - अपील आणि उमेदवारांची यादी १३ सप्टेंबर - अर्ज माघारी घेणे १४ सप्टेंबर दुपारी ३ पर्यंत - फायनल उमेदवारांची यादी १४ सप्टेंबर - प्रत्यक्ष निवडणूक २४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १२ पर्यंत - मतमोजणी २६ सप्टेंबर - चार सदस्यांसाठी शिफारस व निकाल २७ सप्टेंबर - निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक ३० सप्टेंबर रोजी होणाऱ