सुस्ते परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीठ
सुस्ते : पंढरपूर तालुक्यातील सुस्ते परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे जागोजागी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
एकीकडे लाॅकडाऊनमुळे शेतमालाला दर नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, तर दुसरीकडे कर्ज काढून पिकविलेली हातातोंडाशी आलेल्या द्राक्षे बागा अचानक झालेल्या गारपिटीने उद्ध्वस्त झाल्या आहेत, तसेच वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या, डाळिंब, पपई व केळीच्या बागांचेही नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे सुस्ते परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला आहे.
कोट : गेल्या वर्षी कोरोनामुळे द्राक्षे बागेला केलेला खर्च निघाला नव्हता. कवडीमोल किमतीने द्राक्षे विकली गेली. पुन्हा यंदा कर्ज काढून द्राक्ष बाग सांभाळली. सध्या काढणी सुरू असताना, अचानक वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसल्याने तीन एकर बाग जमीनदोस्त झाली आहे.
- नानासाहेब नागटिळक,
द्राक्षे उत्पादक शेतकरी सुस्ते