ठेकेदार शाळाखोल्याही पाडण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत ‘त्या’ शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे भविष्य काय, या प्रश्नाचे उत्तर मात्र प्रशासन देताना दिसत नाही. गेल्या सहा महिन्यांपासून शाळेच्या पर्यायी जागेचा प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर यांच्याकडे प्रलंबित आहे.
सावंतवाडी-दसूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही नियोजित पालखी मार्गाच्या मध्ये येते. शासनाने त्याचा मोबदला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. दसूर ग्रामस्थ, सावंतवाडी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, पंचायत समिती (माळशिरस), जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार आदी पदाधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. परिणामी शाळेमध्ये शिकणाऱ्या पहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य काय, असा प्रश्न समाजातून उपस्थित होत आहे. मुलांचे शैक्षणिक भवितव्य वाचविण्यासाठी नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कधी निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोट :::::::::::::::::::
आम्ही ग्रामस्थांनी प्रशासनाला विनंत्या करून, निर्वाणीचा इशारा देऊनही शाळेसाठी नवीन जागा खरेदीचा निर्णय न होताच संरक्षक भिंत आणि स्वच्छतागृह पाडले. मात्र शाळाखोल्या बांधकामाला धक्का लावला तर दसूर हद्दीतील रस्त्याचे काम बंद पाडू.
- धनंजय सावंत, लोकप्रतिनिधी, दसूर