माढा : सरकारच्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ माढ्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातून बैलगाडी मोर्चा काढला.
त्यानंतर कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे आपल्या मागणीचे निवेदन देऊन लक्ष वेधले. डिझेल, पेट्रोल, गॅस, वीज बिल यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे. केंद्र सरकारने इंधन दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज सकाळी १०.३० वाजता येथून या बैलगाडी मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चामध्ये पाच बैलगाड्या, पाच ट्रॅक्टर व अनेक सायकलींवरती बसून मोर्चामध्ये कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोटारसायकल बैलगाडीमध्ये ठेवून इंधन दरवाढीच्या निषेध करण्यात आला. सायकलीवरती काही लोक मोर्चामध्ये सहभागी झाले. या बैलगाडी मोर्चाचे नियोजन शिवसेना शहर प्रमुख संभाजी साठे यांनी केले होते.
माढा शिवसेना शहर प्रमुख शंभुराजे साठे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधात डिझेल, पेट्रोल, गॅस, वीज बिल दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी आंदोलन करण्यात आले. यावेळी माढा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नायब तहसीलदार विजय लोकरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शंभुराजे साठे, भय्या खरात, बबन पाटील, सत्यम लो॔ढे, संदीप सुनील साठे, शरद वारकड, राहुल शिंदे, आबा साठे, गौतम शिंदे, महादेव देवकुळे, यशवंत पाटील, हनुमंत जाधव, दीपक गव्हाणे, राहुल विरकर, राहुल मस्के, धनाजी कोठावळे, निशांत पालकर, संदीप शिंदे, पांडुरंग बंडगर उपस्थित होते.
----
फोटो : ०९ माढा स्ट्राईक
डिझेल, पेट्रोल, गॅस, वीज बिल दरवाढीच्या निषेधार्थ माढ्यात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.