कुर्डूवाडी येथील या आगीत तन्वीर शेख यांचे टायर वर्क्स, पांडुरंग उबाळे यांचे टेलरिंग दुकान, नागेश आदलिंगे यांचे सायकल दुकान, अशपाक शेख यांचे चिकन सेंटर, सिद्धेश्वर गवळी यांचे हॉटेल, राहुल माने यांचे चायनीज व रसवंती दुकान, संजय काशीद यांचे सलून दुकान, ही दुकाने जळाली आहेत. यावेळी जवळच्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका ट्रॅव्हलमधील प्रवाशांनी आग लागलेल्या हॉटेलमालकाला बोर्डवरील असलेल्या फोनद्वारे ही घटना कळविली. त्यानंतर तेथे नागरिकांची गर्दी झाली. येथील न्यू गवळी चहाच्या हाॅटेलमध्ये प्रथम विजेचे शॉर्टसर्किट झाले. त्यातून ही आग वाढत गेली व शेजारच्या सर्व दुकांनाकडे पसरत गेली.
यादरम्यान लागलेली आग ही पसरत गेल्यामुळे हॉटेलमध्ये असलेल्या गॅस सिलिंडर टाकीचा स्फोट झाला. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी जमलेल्या काही नागरिकांनी नगराध्यक्ष समीर मुलाणी यांना फोन करून अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवून देण्यास सांगितले. त्यानंतर नगराध्यक्ष मुलाणी यांनी तात्काळ संबंधितांना सूचना देत अग्निशामक दलाची एक गाडी पाठविली.
तसेच विठ्ठलराव सहकारी साखर कारखान्याची अग्निशमन गाडीदेखील आली. दीड तासाच्या प्रयत्नानंतर ही आग पूर्ण आटोक्यात आणण्यात यश मिळाले. यात अग्निशामक दलाचे अर्जुनसिंग राजपूत, बंडू जाधव, सिद्धेश गोफणे यांनी काळजीपूर्वक व तातडीने ही आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले.
त्याला घटनास्थळी धाव घेत नगराध्यक्ष समीर मुलाणी, मार्केट कमिटीचे संचालक बंंडू भोसले, ग्रामपंचायत सदस्य रविराज बागल, प्रा. डॉ. आशिष रजपूत, संभाजी ब्रिगेडचे हर्षल बागल, बालाजी कदम, धनाजी माने, तानाजी माने यांनीही मोलाची मदत केली.
फोटो
२३कुर्डूवाडी०१,०२,०३
कुर्डूवाडीतील दुकानांना लागलेल्या आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले.