अक्कलकोट आगारातील परिवहन मंडळाच्या बससेवा अनेक दिवसांपासून डिझेल नसल्यामुळे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होत आहे. वयोवृद्ध, महिला, पुरूष व विद्यार्थी प्रवाशांचे हाल होत आहेत. बस सेवा सुरळीत करण्याची मागणी रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी अक्कलकोट आगार प्रमुख म्हंता व चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रिपाइं जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी,जेष्ठ नेते सोपान गायकवाड, तालुका उपाध्यक्ष अंबादास गायकवाड, युवा तालुकाध्यक्ष आप्पा भालेराव, शहराध्यक्ष प्रसाद माने, विश्वनाथ इटेनवरू,अंबादास शिंगे, सुरेश सोनकांबळे, इरणा दसाडे, दत्ता कांबळे राहूल झळकी, निगराज निबाळ, बसवराज गजधाने, सोमनाथ दसाडे, जयकुमार सोनकांबळे, रवी सलगरे, लक्ष्मण कोटी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
२३अक्कलकोट-एसटी
अक्कलकोट येथे बस सेवा सुरळीत करण्यात यावे या मागणीने बसवर चढून आंदोलन करताना अविनाश मडीखांबे, प्रसाद माने, अप्पा भालेराव, सोपान गायकवाड, अंबादास गायकवाड आदीजण दिसत आहेत