अनेक यंत्र प्रमाणित करून लोकांच्या वापरासाठी विकसित केली जात आहेत. मात्र ग्रामीण भागात स्वकौशल्याने कमी खर्चात टाकाऊ वस्तूपासून तयार केलेल्या अनेक यंत्रांचे जुगाड सध्या शेतकरी वापरताना दिसत आहेत. यामध्ये विविध प्रकारची यंत्रे, मशीनचा वापर करून दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सोयीस्कर ठरणारे जुगाड सध्या प्रकाशझोतात आली आहेत. याद्वारे उपजीविकेचेबरोबरच व्यावसायिक पद्धतीने अनेक जुगाडांचा वापर लक्षवेधी ठरत आहे.
विविध पद्धतीचे जुगाड...
दुचाकीच्या बाजूला शंभर ते दीडशे किलो वजन सहज पेलणारा सांगाडा, जुन्या जीपला मळणी मशीनचे जुगाड, रसवंती गाड्याला इंजीनद्वारे पुढे ढकलण्याची पद्धत, दुचाकीला छोट्या ट्रॉल्या जोडून शेतातील चारा आणण्यासाठी वापर, कालबाह्य अनेक वस्तूंपासून शेती व इतर व्यवसायाशी उपयुक्त यंत्रसामग्रीचे जुगाड ग्रामीण भागात सर्रास आढळून येत आहे.
कोट ::::::::::::::::::
सध्या व्यवसायात सोयीनुसार आवश्यक तो बदल झाला तरच सोयीचे ठरते. त्यामुळे अनेक बदल लोक स्वतः अनुभवातून पुढे सिद्ध करतात. वेगवेगळ्या पद्धतीचे जुगाड तयार करून त्याचा उपयोग दररोजच्या अत्यावश्यक गोष्टींमध्ये केला जातो.
- शिवाजी नरळे
भांबुर्डी