सोलापूर : कौठाळी ( ता. पंढरपूर) येथील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी सकाळी १० ते दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औदुंबर जगन्नाथ वाघमारे ( वय ६०, रा. कौठाळी, ता. पंढरपूर) यांच्या घराचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट व पत्र्याची पेटी उचकटून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिवसे करत आहेत.