शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

रोहित्र जळाल्यास नियंत्रण कक्षाला करा फोन; अवघ्या दोनच दिवसात दुसरा दिसेल शेतात, महावितरणचा उपक्रम

By appasaheb.patil | Published: February 13, 2023 2:40 PM

Solapur News:

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर : रब्बीच्या हंगामात शेतीपंपाच्या वीज मागणीत जशी वाढ होते तसा महावितरणच्या वीज यंत्रणेवर ताण येतो. परिणामी अतिभारामुळे रोहित्र जळतात. मागील ७० दिवसांत ३२७० रोहित्र जळाले होते. त्यातील ३२४० रोहित्र महावितरणने तातडीने बदलले. आता फक्त ३० रोहित्र बदलणे बाकी आहे. रोहित्र तातडीने बदलता यावे यासाठी शेतकऱ्यांनी रोहित्र नादुरुस्त होताच कंपनीच्या कंट्रोल रूमला फोन केल्यास अवघ्या दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या शेतात रोहित्र बसविण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणने दिली.

बारामती परिमंडल कार्यालयांतर्गत महावितरणची सातारा, सोलापूर व बारामती असे तीन मंडल कार्यालये आहेत. सोलापूर मंडलात ५५१०४, सातारा ३०६१७ व बारामती मंडलात ३९२२५ रोहित्र आहेत. सरासरी ७.४४ टक्के रोहित्र वर्षभरात नादुरुस्त होतात. अनधिकृत वीज भार, कॅपॅसिटरचा वापर टाळणे ही रोहित्र जळण्याचे प्रमुख कारणे आहेत. रब्बी हंगामात सर्वाधिक रोहित्र जळतात, असेही महावितरणने सांगितले.

हा आहे सोलापूर जिल्ह्यातील नियंत्रण कक्षाचा नंबरजळालेले रोहित्र तातडीने बदण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असून, रोहित्र जळताच शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या दैनंदिन नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रूम) फोन करावा. जेणेकरून संबंधित रोहित्र तातडीने बदलणे शक्य होईल. नियंत्रण कक्षाचे क्रमांक सोलापूरसाठी ९०२९१४०४५५ हा नंबर आहे. या क्रमांकावर शेतकऱ्यांनी फोन केल्यास रोहित्र बदण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जातील.'

कॅपॅसिटरचा वापर करा...रोहित्र व कृषिपंप वाचवायचे असतील तर कॅपॅसिटरचा वापर करणे हा किफायतशीर उपाय आहे. कॅपॅसिटरमुळे वीजभार कमी होतो. मोटारीचे कंपन कमी होते. पाण्याचा विसर्ग वाढतो. रोहित्र व कृषिपंपाची कार्यक्षमता व आयुर्मान सुधारते. वितरण हानी टळून शेतकरी व कंपनी दोघांचाही फायदाच होतो व गैरसोयही टळते, असेही महावितरणने कळविले आहे.

टॅग्स :electricityवीज