शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कोरोना लढ्यात प्राण गमावणाºया योद्ध्यांना ‘शहीद’ असे संबोधा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 12:27 PM

सर्वोच्च न्यायालयास विनंती; सोलापूरच्या वकिलांनी पाठविले पत्र

ठळक मुद्देकोरोनाचे संकट वाढत आहे, याला दोन हात करण्यासाठी सध्या डॉक्टर, पोलीस व रूग्णालयातील कर्मचारी समोर येऊन लढत आहेतआपण सध्या घरात बसून स्वत:चे संरक्षण करीत आहोत, मात्र ही मंडळी आपला जीव धोक्यात घालत आहेतसध्या सीमेवरच्या जवानांची भूमिका हे लोक पार पाडत आहेत. मृत्यूनंतर त्यांचा सन्मान झाला पाहिजे

सोलापूर : कोरोनाविषयी गंभीर लढ्यात आपले प्राण गमावणाºया योद्ध्यांना ‘शहीद’ संबोधा, अशी विनंती करणारे पत्र सोलापुरातील वकील मंडळींच्या वतीने अ‍ॅड. मंजुनाथ कक्कळमेली यांनी सर्वाेच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस.ए. बोबडे यांना दिले आहे. पोलीस, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून कोरोनाशी दोन हात करीत आहेत. 

कोविड-१९ हा संसर्ग सध्या वाढत आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. डॉक्टर आपल्या कुटुंबाची पर्वा न करता २४ तास रूग्णसेवा बजावत आहेत. या रुग्णसेवेत परिचारिका, रुग्णालयाचे कर्मचारी आपले मोठे योगदान देत आहेत. कोरोनाग्रस्तांची सेवा बजावताना ही मंडळी एक प्रकारे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत. ही सेवा बजावत असताना यातील काही जणांना आपले प्राण गमवावे लागले.

‘कोरोनामुळे त्यांचा मृत्यू’ असा उल्लेख न करता ‘कोरोनासारख्या युद्धातील शहीद’ असे त्यांना संबोधले पाहिजे, असे अ‍ॅड. कक्कळमेली यांनी पत्रात म्हटले आहे. कोरोनाने मृत्यू होणाºयांचा अंत्यविधी शासकीय इतमामात व्हावा व त्यांच्या कुटुंबीयांना पूर्ण वेळ पगार देण्यात यावा, युद्धात शहीद होणाºया जवानांना ज्या सवलती असतात त्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देण्यात याव्यात. याबाबतचे निर्देश केंद्र शासनाला द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. 

संदर्भाचाही केला उल्लेख...- चीन सरकारने आपल्या एका डॉक्टराला मरणोत्तर हुतात्मा म्हणून जाहीर केले आहे. २१ एप्रिल २0२0 रोजी ओडिसा सरकारने कोरोनाविरुद्ध लढणाºयांना योद्धा जाहीर केले आहे. याबाबतचा संदर्भ जोडला आहे. भारतात शहीद कोणाला संबोधावे याबाबत कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यावर सुद्धा उपाययोजना करण्याबाबत केंद्र शासनाला निर्देश द्यावे, असेही मुख्य न्यायमूर्ती एस.ए. बोबडे यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

कोरोनाचे संकट वाढत आहे, याला दोन हात करण्यासाठी सध्या डॉक्टर, पोलीस व रूग्णालयातील कर्मचारी समोर येऊन लढत आहेत. आपण सध्या घरात बसून स्वत:चे संरक्षण करीत आहोत, मात्र ही मंडळी आपला जीव धोक्यात घालत आहेत. सध्या सीमेवरच्या जवानांची भूमिका हे लोक पार पाडत आहेत. मृत्यूनंतर त्यांचा सन्मान झाला पाहिजे, म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र पाठविले आहे. -अ‍ॅड. मंजुनाथ कक्कळमेली, सदस्य सोलापूर बार असोसिएशन, सोलापूर.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय