रेकी करण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे. या काळामध्ये नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत, अफवांवर विश्वास ठेवू नये. संबंधित बिबट्या हा नरभक्षक असून तो एकटाच वावरत आहे. या काळामध्ये पुढील हानी टाळण्यासाठी उपद्रवग्रस्त क्षेत्रात स्थानिक ग्रामस्थांनी जनजागृतीमध्ये सहभाग घ्यावा व बिबट्याच्या हालचालीची माहिती तत्काळ कळवावी असे आवाहन सोलापूर वनविभाकडून केले आहे.
या काळात बिबट्याचा वावर असलेला परिसर हा तूर, ज्वारी व इतर पिके असलेला हजार-हजार हेक्टरचे सलग क्षेत्र असल्याने यामध्ये त्याचा शोध घेणे अतिशय कठीण होत आहे. तरी पण बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बिबट्याला पिंजराबंद करण्यास तसेच गरजेप्रमाणे तज्ज्ञाच्या उपस्थितीत बेशुद्ध करून बंदिस्त करण्याची परवानगी प्राप्त झाली आहे. क्षेत्राची भौगोलिक परिस्थिती व इतर कारणांमुळे बिबट्याला जेरबंद अथवा बेशुद्ध करणे शक्य न झाल्यास या बिबट्यापासून अधिक मनुष्यहानी टाळण्यासाठी त्याला ठार मारण्याची परवानगी मिळाली आहे. पुढील कार्यवाही चालू आहे. असेही वनविभागामार्फ़त सांगण्यात आले.
----