कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली होती. या भारत बंदला काँग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला आहे. या बंदमध्ये सहभागी होत जिल्हा व तालुका कॉंग्रेसच्या वतीने आज पानीव (ता. माळशिरस) येथे एकदिवशीय उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रकाश पाटील बोलत होते.
शेतकरी विरोधी कृषी कायद्यांना मंजूरी, अनुभव नसलेल्या कंपन्यांंकडून राफेलची खरेदी, एक देश एक कर म्हणून जीएसटीतून पेट्रोल व डिझेल वगळणे, बहुतांश राष्ट्रीयीकृत आस्थापनांचे खाजगीकरण यावरून केंद्र सरकार हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिक आहे. यामुळे शेतकऱ्यांसह देशवासियांनी वेळीच जागृत होऊन केद्र सरकारच्या विरोधातील लढाईत सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार रामहरी रूपनवर यांनी केले.
यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिरीष फडे, कार्याध्यक्ष नागेश काकडे, युवा तालुकाध्यक्ष सौरभ रुपनवर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दादासाहेब पाटील, राजाभाऊ रुपनवर, राजीव गायकवाड, बाळासाहेब मगर, अमोल पाटील, प्रताप घुले, अतुल देवकर, संतोष शिंदे, विठ्ठल चव्हाण, दिनेश शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटो ::::::::::::::::::::
पानीव येथे कृषी कायदे व इंधन दरवाढीच्या विरोधातील आंदोलनात सहभागी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार रामहरी रूपनवर व कॉग्रेसचे कार्यकर्ते.