सीना दारफळ ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष साठे व बाळासाहेब उबाळे या दोन ग्रामपंचायत सदस्यांनी १९ मार्चची मासिक सभा रद्द करण्याची मागणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ही मासिक सभा रद्द करून, २२ जूनच्या मासिक सभेत मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करण्याच्या विषयाला विरोध असूनही ग्रामपंचायत सदस्यांची चुकीची नावे टाकली जातात. आम्ही लोकप्रतिनिधी असूनही आम्हाला आमच्या अधिकारापासून दूर ठेवले जात आहे. त्यामुळे सदर मासिक सभा रद्द करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचे निवेदन बीडीओंना दिले आहे.
----
आम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. मात्र, ग्रामपंचायत मासिक सभेचा अजिंठा न देता परस्पर मासिक सभा घेतली. आम्हाला दूर ठेवणे म्हणजे अधिकारापासून ठेवत आमचा हक्क हिरावून घेतला आहे. यामुळे ती मासिक सभा रद्द करण्यात यावी.
- संतोष साठे व बाळासाहेब उबाळे ग्रा.पं. सदस्य.
----
आचारसंहिता कालावधीत विकास कामाचे ठराव घेता येत नाहीत. मी पदभार घेण्यापूर्वी झालेल्या मासिक सभेत ठरावाचे मागील प्रोसिडिंग मागील महिन्यातील मासिक सभेत वाचून दाखविल्यानंतर सहा सदस्यांनी पाठिंबा देऊन कायम केले आहे. याला दोन सदस्यांनी विरोध केला होता. मागील मासिक सभा रद्द करण्याची मागणी केली होती.
- लक्ष्मण राऊत, ग्रामसेवक दारफळ.
----
...अन्यथा उपोषण
पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता १९ मार्च रोजी सुरू होती. मात्र, या कालावधीत मासिक घेतली कशी, याची चौकशी करून, संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा अण्णासाहेब जनार्दन बारबोले यांनी दिला आहे.
----
----