ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचे अनेकांचे स्वप्न असते, मात्र आवश्यक त्या गटांनी प्रमाणित केलेले अथवा जनाधार असलेले अनेक उमेदवार ऐनवेळी घोषित केले जातात. या उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करण्यासाठी गावोगावचे काही मोजक्या व विश्वासू कार्यकर्त्यांच्या खांद्यावर धुरा दिली जाते. याशिवाय काही ‘एकला चलो रे’चा सूर लावत अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः आवश्यक ती कागदपत्रे जुळविण्यात व्यस्त दिसतात. याशिवाय उमेदवारांचा खर्चाचा ताळेबंद जुळवून प्रशासनाला द्यावा लागणार आहे. त्यादृष्टीनेही याची पूर्तता करण्यासाठी अनेक कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.
या कागदपत्रांसाठी सुरू आहे धावपळ
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये वेगवेगळे वार्ड, वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रमाणात राखीव असतात. यामध्ये जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, शौचालय असल्याचा दाखला, अपत्य दाखला, बेबाकी प्रमाणपत्र, माहिती खरी असल्याबाबतचे घोषणापत्र, मतदार यादी झेरॉक्स, मतदान ओळखपत्र याबरोबर खर्चाचा ताळेबंद. त्यासाठी ज्या ठिकाणी खर्च होईल, अशा ठिकाणावरून खर्च झाल्याच्या पावत्या आदी गोष्टींची तयारी करण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ उडाल्याचे चित्र दिसत आहे.
फोटो ::::::::::::::::::::::::
विविध कागदपत्रे संकलनासाठी माळशिरस तहसील कार्यालयसमोर उडालेली झुंबड.