सोलापूर : सोलापूरअक्कलकोट रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर कार व मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातात सोलापूर आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तिघेजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
गौसपाशा बागवान (रा. सलगर तालुका अक्कलकोट)असे ठार झालेल्या कनिष्ठ सहायकाचे नाव आहे. मयत बागवान हे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून काम पाहत होते, सोमवारी सायंकाळी पावणेसहा वाजता ड्युटी संपवून मोटरसायकलवरून गावाकडे परत निघाले होते त्यावेळी समोरून येणाऱ्या कारणे त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, जखमी तिघेजण सोलापूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच अक्कलकोट शहर पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले.