करमाळा (सोलापूर) : करमाळा- टेंभुर्णी महामार्गावर मंगळवारी (ता. १०) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास झरे फाटा परिसरात एका दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या कारने मागून जोरदार धडक दिली. यात आजोबा व नात ठार झाली आहे.
सुट्टीमुळे नात झरे येथे आजोबांकडे आली होती, मात्र तिच्यावर व आजोबांवर काळाने घाला घातला. मृत्यू झालेल्यामध्ये नातीचे नाव संजवनी शंकर मिटे (वय १३) व आजोबा हरिभाऊ सोपान गायकवाड (वय ६५) असे आहे.