सोलापूर : महापालिकेच्या कारभाराचे प्रमुख आजारी पडले आहेत. त्यांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे. हे प्रशासकीय कारभारी दोन दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्या दौऱ्यात सहभागी होते. त्यामुळे या ताफ्यात सहभागी झालेली प्रशासकीय यंत्रणा टेन्शनमध्ये आली आहे.
महापालिकेच्या कोवीड 19 नियंत्रण कक्षाचे प्रमुख चार दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या संपर्कातील अधिकाऱ्यांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. त्यातच महापालिकेचे प्रशासकीय कारभाऱ्यांना रविवारी सकाळपासून ताप आणि डोकेदुखीचा त्रास होत आहे. त्यांचाही स्वॅब घेण्यात आला आहे.
दरम्यान, कारभाऱ्यांच्या संपर्कात दररोज अनेक अधिकारी असतात. दोन दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री, आरोग्यमंत्री दौऱ्यांवर होते. या दौऱ्यानिमित्त विविध ठिकाणी बैठका झाल्या होत्या. यामध्ये जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन, आरोग्य विभागातील अधिकारी सहभागी होते. या यंत्रणेतील काही अधिकारी चिंतेत आहेत. कारभाऱ्यांच्या स्वॅब टेस्टचा अहवाल दुपारी चार वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे.