४५ बाय २५ अशी मोठी रांगोळी साकारून ऋण व्यक्त केले आहे. या रांगोळीमध्ये आरोग्याविषयी जनजागृती, विठ्ठल व दिंडींच्या चित्रांचा समावेश आहे. या रांगोळीचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन १० जून ते २० जून असा माणुसकीच्या नात्याने आरोग्य दिंडी सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. या दरम्यान ते बोलत होते.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, जो उपक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून पंढरपुरात राबविण्यात आला तो महाराष्ट्र राज्यात खऱ्या अर्थाने कौतुक करण्यासारखा असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. प्रास्ताविक करताना श्रीकांत शिंदे यांनी पंढरपूरमध्ये भव्य प्रशासकीय इमारत उभी राहावी. महादेव कोळी बांधवांचे जात प्रमाणपत्र दिले जात नाही त्यांना ते तत्काळ देण्यात यावेत अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली.
यावेळी प्रशासकीय अधिकारी, नगरपालिका सफाई कामगार, १०८ रुग्णवाहिका चालक ,वैद्यकीय अधिकारी, सामाजिक संघटना,अरुण कोळी, संजय ननवरे, सूरज पालवे, रॉबिनहूड आर्मी, छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळ, मुजुद्दीन कमलेवाले, सूरज राठी यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
यावेळी सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, श्रीकांत शिंदे, युवराज पाटील, गणेश पाटील, जयमाला गायकवाड, सुधीर भोसले, संदिप मांडवे, सुवर्णा बागल, साधना राऊत, चारुशिला कुलकर्णी, श्रेया भोसले, मोहम्मद उस्ताद, प्रशांत बाबर, विजय देशमुख, अनिल अभंगराव, दीपक पवार, स्वप्नील जगताप, कीर्ती मोरे, संगीता माने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संतोष बंडगर, दादा थिटे, नीलेश कोरके, राधा मलपे यांनी परिश्रम घेतले.
फोटो : रांगोळीचे उद्घाटन करताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, श्रीकांत शिंदे, युवराज पाटील, गणेश पाटील, जयमाला गायकवाड, सुधीर भोसले.