शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

वाहकाला सापडलेले पैशाचे पाकीट वृद्धाला केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 1:05 PM

माणुसकी आजही जिवंत; एस.टी.चे कंडक्टर-चालकाचा प्रामाणिकपणा

ठळक मुद्देवाहक शशिकांत मोहरकर व चालक शिंदे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुकएस.टी़ महामंडळात प्रामाणिकपणे काम करणारी माणसंएस.टी़ महामंडळात प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आहेत

सोलापूर : सरका.. सरका़.. पुढं सरका.. मला आत येऊ द्या़.. तात्या़.. अण्णा़.. बापूजी पुढं सरका़.. तो पायरीवर उभे राहून बसचा दरवाजा बंद करतो. दोन-तीन वेळा शिट्टी फुंकतो. थोडा गोंधळ कमी होतो़.. कंडक्टर बोलायला सुरुवात करतो. अशाप्रकारे एस.टी.चे कंडक्टर-चालक नित्याचेच काम करत असतात. पण कर्तव्य बजावत असताना आपल्यातील माणुसकी पण जपत असतात.

आपल्या कर्तव्यात कोणताही कसूर न करता एसटी वाहक आणि चालकांनी प्रामाणिकपणा दाखवून एका वृद्ध नागरिकाच्या पैशाचे पाकीट परत केले. त्यामुळे एसटीचा प्रवास आजही सुरक्षित असल्याचे यावरून दिसून आले आहे. त्याचं झालं असं की.. अक्कलकोट डेपोच्या चुंगी-अक्कलकोट बसमध्ये चुंगी येथील प्रवासी चढला़ बुधवार अक्कलकोटचा आठवडा बाजार असल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी गर्दी झाली़ एस.टी. बस अक्कलकोटच्या दिशेने निघाली़ एस.टी़चे चालक शिंदे व वाहक मोहरकर यांनी बसमधील गर्दीतून वाट काढत नेहमीप्रमाणे प्रवासांचे तिकीट काढत पुढे जात आपली कामगिरी बजावतं होते.

सकाळची बस वेळेवर आली. सर्व प्रवासी खाली उतरून आपल्या मार्गी निघाले. वाहक शशिकांत मोहरकर (वाहक क्रमांक -११८०८६) यांनी नेहमीप्रमाणे पूर्ण बस चेक करत असतानाच एका सीटवर एक पाकीट दिसले़ ताबडतोब हातात घेऊन पाहिले तर त्यात आधार कार्ड, फोटोसह जवळजवळ ११,१४० (अकरा हजार एकशे चाळीस रुपये) रोख रक्कम होती. कुठल्या तरी बसमधील प्रवाशाचे पाकीट असणाऱ़़ पण सर्व प्रवासी उतरून गेले होते. कुणाला विचारणार म्हणून वाहक मोहरकर यांनी ताबडतोब अक्कलकोट बसस्थानकांतील वाहतूक नियंत्रण अधिकारी परास यांना सर्व हकिकत सांगून त्यांच्या ताब्यात पैशांनी भरलेले पाकीट दिले. चुंगी येथील प्रवासी आहेत, कोणी आले तर त्यांना द्या म्हणून सांगून निघून गेले.

थोड्या वेळाने संबंधित व्यक्ती चुंगी येथील रहिवासी नागुशा बनपट्टे यांनी चौकशी केली. माझं पाकीट हरवल्याची खात्री पटली़ त्यानंतर पाकिटासह रोख रक्कम, कागदपत्रे त्यांच्याकडे देण्यात आली. वाहक शशिकांत मोहरकर यांना बोलावून घेऊन वृद्ध व्यक्ती नागुशा बनपट्टे यांनी आभार व्यक्त केले. नागुशा बनपट्टे व त्यांच्या पत्नीने शशिकांत मोहरकर यांना आशीर्वाद दिले. ‘खूप चांगले काम केलास़..बाबा सुखी आनंदात राहा’ असा आशीर्वाद दिला. बनपट्टे हे बक्षीस देत होते, पण मोहरकर यांनी नाकारले़ तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी मोठे बक्षीस असल्याचे म्हणाले़

सर्वत्र कौतुक- वाहक शशिकांत मोहरकर व चालक शिंदे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शशिकांत मोहरकर वागदरीचे आहेत. कोकणात दापोली येथे कार्यरत असतानाच मागे एकदा पैशांनी भरलेली बॅग परत केली होती़ एस.टी़ महामंडळात प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आहेत, म्हणून एसटीचा प्रवास आजही सुरक्षित असल्याचे यावरून दिसून आले़

टॅग्स :SolapurसोलापूरST Strikeएसटी संपBus Driverबसचालक