शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

तात्पुरत्या मनाईच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय : दीपक आहेरकर यांच्यावरील कारवाई प्रकरण

By admin | Published: May 08, 2014 10:22 PM

सोलापूर :

सोलापूर : शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय ट्रस्ट, सोलापूरचे मानद सचिव दीपक आहेरकर यांना पदावरून काढून टाकल्यानंतर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे, अशी माहिती संस्थेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय ट्रस्ट, सोलापूरच्या मानद सचिव पदावर दीपक आहेरकर यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र दीपक आहेरकर यांनी पदाचा गैरवापर केल्याने दि.९ जून २0१२ च्या सभेत कायदेशीर ठरावाने त्यांचे मानद सचिव पद काढून घेण्यात आले होते. दरम्यान त्यांनी दि.६ जून २0१२ रोजी दिवाणी न्यायालयात पदावरून काढून टाकू नये म्हणून दावा दाखल केला होता, मात्र त्यांनी याची माहिती ९ जूनच्या सभेत दिली नव्हती किंवा सदस्यांनाही सांगितले नव्हते. त्यामुळे सभेत रिक्त झालेल्या पदावर डॉ. प्रदीप कोठाडिया यांची ट्रस्टचे मानद सचिव म्हणून नेमणूक केली आहे. दीपक आहेरकर यांच्या दाव्यामुळे त्यांच्यावरील कारवाईला प्रमुख जिल्हा न्यायाधीश आश्विनकुमार देवरे यांनी तात्पुरत्या मनाईचा आदेश दि.११ एप्रिल २0१४ रोजी दिला आहे. या निर्णयाच्या विरूद्ध संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करून घेतले होते. त्यावर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या मनाई आदेशास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या खटल्यात संस्थेतर्फे ॲड. शहा यांनी काम पाहिले तर दीपक आहेरकर यांच्यातर्फे ॲड. विनित नाईक, ॲड. आय.एम. खैरदी हे काम पहात आहेत. (प्रतिनिधी)