कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील वीज वितरण कार्यालयाकडून शेतीपंपाच्या वीज बिलाची सक्तीने वसुली सध्या जोरात सुरू आहे. आता कुठे कोरोनाचे सावट कमी होते आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांची वीज कपात करून शेतकऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव असताना आणखी एक संकट शेतकऱ्यांवर लादू नये, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतीमालालाही कवडीमोल दर बाजारात मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जगणेही मुश्कील झाले आहे. त्यातच वीज वितरण कार्यालयाचा वीज बिल वसुलीसाठी तगादा चुकीचा आहे. शेतकऱ्यांची शेतीपंपाची सक्तीची वीज बिल वसुली तत्काळ थांबवावी व विद्युत वितरण व्यवस्थित सुरू करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या फळभाज्या व पालेभाज्यासमवेत मोडनिंब( ता. माढा) येथील वीज वितरण कार्यालयासमोर सोमवारी सकाळी १०.०० वाजता आंदोलन करण्यात येईल असा इशारा झेडपीचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे दिलेल्या निवेदनात दिला आहे.
210821\20210821_174653.jpg
शिवाजी कांबळे फोटो