सोलापूर : आहेरवाडीच्या सरपंच लक्ष्मीबाई पंडित पाटील यांच्यासह तिघांनी
संगनमताने ग्रामपंचायतीच्या बँक खात्यातून ४० हजार रुपयांचा अपहार
केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहेरवाडीच्या सरपंच लक्ष्मीबाई पाटील यांचे पुत्र शशिकांत पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या खात्याचे चेकबुक जाणिवपूर्वक स्वतःकडे ठेवले. ग्रामसेवक चंद्रकांत पाटील यांनी आहेरवाडीच्या बँक ऑफ इंडिया शाखेत
कराच्या रकमेचा भरणा केला होता. पाणीपुरवठ्याच्या खर्चासाठी रक्कम
काढण्यासाठी बँकेत गेले असता खात्यावर शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. शावरसिद्ध शावरी यांच्या नावे चेक काढून खात्यातील रक्कम काढली होती. या चेकवर ग्रामसेवकांची बनावट सही केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे
ग्रामसेवक चंद्रकांत सुभाष पाटील यांनी वळसंग पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
सरपंच लक्ष्मीबाई पाटील त्यांचे पुत्र शशिकांत पाटील आणि
स्वीय सहायक शावरसिद्ध शावरी या तिघांविरोधात वळसंग
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक पाटील तपास
करीत आहेत.