जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी देऊनही अक्कलकोटमध्ये जनावरांचा बाजार सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत होता. बाजार समिती सभापती संजीवकुमार पाटील यांच्याशी संपर्क साधून जनावरांचा बाजार भरविण्याची मागणी केली. मार्केय यार्डात बाजार भरविण्यास परवानगी नसल्याने शेतकरी यार्डाच्या गेटसमोरच जनावरे आणून विक्री करीत होते. वाहनांची वर्दळ असल्याने अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे बाजार यार्डात भरविण्यास परवानगी देण्याची मागणी होत होती. त्यासाठी हरवाळकर यांनी बाजार समिती प्रशासनाशी चर्चा करून यार्डात जनावरांचा बाजार भरविण्यास परवानगी मिळविली. त्यानुसार आता आतमध्ये बाजार भरत असल्याचे पशुपालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी वलीअहमद कुरेशी, चिदानंद हलसंगी, इस्माईल नदाफ, बाबू घंटे, कांतू पुजारी, रमजान बेपारी, शिव पुजारी, विजू व्हानमाने, राजू कंटोळी, बिरप्पा घोडके, राम गलोळी, सलीम कामळीवले आदी उपस्थित होते.
.......................
फोटो ओळी अक्कलकोट बाजार समितीत जनावरांच्या बाजारात शेळ्या, मेंढ्या विक्रीसाठी दाखल झाल्याचे दिसत आहे.
........
फोटो २२अक्कलकोट