सोलापूर : पाचव्या वेतन आयोगाच्या सुधारणा संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने, संघटनेच्या बाजूने निकाल दिला आहे. परंतु शासन त्या विरोधात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे टिचर्स संघटनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ.एम.ए. वाहुळ यांनी दिली.
सात रस्ता येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयातील, कर्म लक्ष्मी सभागृहात असोसिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर ॲन्यूएड टीचर्स संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेत डॉ. एम.ए. वाळुळ बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय सचिव डॉ.जे.एम. मंत्री, केंद्रीय कोषाध्यक्ष प्राचार्य एस.बी.नाफडे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. वाहुळ म्हणाले की, सभासदांना न्याय मिळवून देणे हे संघटनेचे कर्तव्य आहे. त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.
शासनाची भूमिका दुटप्पी असल्यामुळे त्याविरुद्ध संघटनेने भूमिका घेतली आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे न्याय मागितला आहे. प्रास्ताविक विभागीय उपाध्यक्ष प्राचार्य एम.ए. शेख यांनी केले. अहवाल वाचन विभागीय सचिव डॉ.रवींद्र बीडकर यांनी केले तर आभार प्राचार्य बी.जी. आहिरे यांनी मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी प्रा .उत्तमराव चौगुले, योगेश पोळ यांनी प्रयत्न केले. यावेळी विभागीय कोषाध्यक्ष प्रा.साळुंखे, डॉ. निनाद शहा, प्राचार्य डॉ. माणिकशेटे, प्रा.जगदीश खानापुरे, प्रा.वाय. एन. माने, डॉ.व्ही.एम. कुर्नावळ, प्रा.एस.के. देशमुख, डॉ.एम.बी.चव्हाण, डॉ.आय.एस. पटेल, डॉ.गढवाल, डॉ.भीमाशंकर बिराजदार, डॉ.संजय आळंदकर, प्रा.इंगळे आणि टी.एन. लोखंडे, डॉ.उत्तमराव घोडके, डॉ.पंजाबी बिराजदार, प्रा.एस.एम. विभुते, डॉ.एस.जे. आवटे यांच्यासह बहुसंख्य सेवानिवृत्त सभासद उपस्थित होते.