अक्कलकोट : अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शिवशरण खेडगी यांचे शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांत मोठे योगदान आहे. गेली दोन
वर्षे कोरोनाने पालकांची आर्थिक कोंडी केली आहे. या पार्श्वभूमीवर खेडगी स्कूलने फी मध्ये ४० टक्के सवलत जाहीर केली आहे. उद्योग, व्यवसाय बंद आहेत. शाळा-कॉलेजही बंद होते. यामुळे शाळेतील मुलांच्या शैक्षणिक फीचा प्रश्न उपस्थित झाला असून, सद्य:स्थितीचे भान ठेवून खेडगी यांनी सी. बी. खेडगी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शैक्षणिक फी मध्ये ४० टक्के सवलत देऊन दिलासा दिला आहे.
राज्यात फीचा प्रश्न संस्था, शासन स्तरावर तसेच न्यायालयाच्या कक्षेत असल्याने तो सुटण्यापूर्वी कोरोनाने आर्थिक फटका बसल्याने सवलतीने भार हलका होणार आहे. या सवलतीमुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, ही सवलत फक्त ऑनलाइन शिक्षण काळापुरती मर्यादित असणार असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. सुसज्ज प्रशस्त इमारतीच्या दालनात दररोज सातत्यपूर्ण ऑनलाईन क्लासेस तासिका सुरू असून, प्रत्येक ऑनलाईन लाईव्ह क्लासेसमध्ये वीस मिनिटे ब्रेक देण्यात आला आहे. शाळेचे स्वतःचे स्वतंत्र स्कूल ॲप आहे. (वा. प्र.)