शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सोलापुरातील नागेश करजगी आॅर्किड शाळेत रंगतो लोकशाहीचा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 2:34 PM

माझी प्रयोगशील शाळा...शिक्षणाचा सोलापुरी पॅटर्न: नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी शाळेचा उपक्रम

ठळक मुद्देमहाराष्ट्राची लोकपरंपरा जपण्याचा प्रयत्न आषाढी दिंडीच्या माध्यमातून केला जातोवारकºयांच्या वेशात विद्यार्थी विठ्ठलनामाचा गजर करतातआजारामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीचाही सामना करावा लागतो

सोलापूर : उमेदवारी जाहीर केल्यानंतर आचारसंहितेचे पालन करुन प्रत्यक्ष प्रचार, मतदारांना मत देण्याचे आवाहन, मतदानाच्या दिवशी मतदारयाद्या पाहून मतदान केंद्रात प्रवेश देणे, मतदारांच्या बोटाला शाई लावून मतदान करणे अशा सर्व बाबी ज्या प्रत्यक्ष निवडणुकीत होतात त्यांचे तंतोतंत पालन नागेश करजगी आॅर्किड स्कूलमध्ये करण्यात येते. याद्वारेच हेड बॉय व गर्ल यांची निवड करण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी हा प्रयोगशील उपक्रम घेण्यात येतो. विद्यार्थ्यांमध्ये ग्रीन, व्हाईट, आॅरेंज, ब्लू असे चार विभाग करण्यात येतात. प्रत्येक विभागासाठी एक कॅप्टन निवडला जातो. या कॅप्टनमधून एक हेड बॉय व एक हेड गर्ल निवडण्यात येते. अशा प्रकारे लोकशाहीचा उत्सवच शाळेमध्ये साजरा करण्यात येतो.

महाराष्ट्राची लोकपरंपरा जपण्याचा प्रयत्न आषाढी दिंडीच्या माध्यमातून केला जातो. बालवैष्णवांचा मेळा शाळेत जमतो. वारकºयांच्या वेशात विद्यार्थी विठ्ठलनामाचा गजर करतात़ यासोबतच शाळेत आरोग्य शिबीरही घेतले जाते. अनेक साथीच्या आजारांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते़ आजारामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीचाही सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता शाळेत भव्य आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले जाते. यात शारीरिक स्वच्छतेविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.

ग्रामीण व शहरी भागात स्वच्छतेअभावी लोक आजारी पडतात. अनेक आजारांना निमंत्रण मिळते.  काहीवेळा तर मृत्यूलाही सामोरे जाण्याच्या घटना घडतात. याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, याबाबत ते जागरुक असावेत यासाठी शाळेमध्ये स्वच्छ भारत अभियानाचा जागर करण्यात येतो. विद्यार्थ्यांना स्वच्छता व आरोग्यविषयक शपथ देण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेला वाव देण्याच्या उद्देशाने वादविवाद स्पर्धचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी स्वच्छ भारत या संकल्पनेवर आधारित वादविवाद स्पर्धेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येते. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कुमार करजगी, संस्थेच्या सचिव वर्षा विभूते, संचालिका नंदिनी करजगी, प्रशासनाधिकारी राजाराम चव्हाण, प्राचार्या अन्नपूर्णा अनगोंडा, डॉ. पी. टी. सावंत, देवेंद्र निंबर्गीकर, श्रीकांत जोशी यांचे मार्गदर्शन लाभते.

पेपर बॅग मेकिंग वर्कशॉपसोबत इतरही उपक्रम- विद्यार्थ्यांसाठी पेपर बॅग मेकिंग वर्कशॉप घेण्यात येते. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते व पर्यावरणाची काळजी घेण्याचा कानमंत्र या माध्यमातून दिला जातो. विद्यार्थ्यांना ऋतूंची ओळख व्हावी, आपल्या वर्गमित्रांसोबत चिमुकल्यांना शाळेत पाऊस अंगावर झेलता यावा, या उद्देशाने ‘रेन डे’चे आयोजन करण्यात येते. गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरूने दाखविलेल्या वाटेवर प्रत्येक जण आपली वाटचाल करतो. त्यांच्यामुळेच विद्यार्थी घडतो. याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी गुरूपौर्णिमेचा उत्सव शाळेमध्ये घेण्यात येतो. 

लोकशाहीची मूल्ये विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच कळणे गरजेचे आहे. यामुळे त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता येते. विद्यार्थी स्वयंप्रेरणेने कार्य करण्यास तयार व्हावा, या उद्देशाने आॅर्किड शाळेमध्ये संसदीय निवडणुकीचे आयोजन केले जाते. या उपक्रमास विद्यार्थ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो.- रूपाली हजारे मुख्याध्यापिका, नागेश करजगी आॅर्किड स्कूल. 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाElectionनिवडणूक