मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखे
राज्यात परिवर्तन होताच काहीच दिवसात ओबीसी समाजाला आपले हक्काचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळाले आहे. यासाठी सुप्रीम कोर्टाचे व राज्यातील युती सरकारचे जाहीर आभार मानतो. या आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीने राज्यभर अनेक आंदोलने, उपोषण केली. भाजपच्या ओबीसी मोर्चानेही सातत्याने यात मोठा सहभाग घेतला. राज्यात पुन्हा युतीचे सरकार आल्यावर लगेच हे आरक्षण पुन्हा मिळणे हा मोठा योगायोग आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा चांगला पायगुण आहे, असे प्रतिपादन भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे यांनी केले.
ओबीसी आरक्षण जाहीर होताच भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे यांनी आमदार समाधान आवताडे यांना पेढे भरवून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठपुराव्याबाबत आपला आनंद व्यक्त केला. यावेळी आमदार समाधान आवताडे, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, विजय माने, दिगंबर यादव, अमोल माने, आदित्य मुद्गुल, सुदर्शन यादव, युवराज शिंदे,राजाराम कालिबाग,सतीश मोहिते,संजय माळी,सुहास पवार रामदास जाधव दादा माळी विकास खिलारे मधू कुटे सचिन अकळे पिंटू भुसे सुशांत हजारे अजित हजारे व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजेंड्यावर ओबीसी आरक्षणचा विषय घेवून कामास सुरवातही केली. आता येणाऱ्या सर्व निवडणुका या ओबीसी आरक्षणासह होणार याचा सर्वात मोठा आनंद आज होत आहे. ओबीसी समाजाला २७ % राजकीय आरक्षण देण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याचे जाहीर झाल्यावर या निर्णयाचे भाजप युवा मोर्चाने स्वागत करत आ समाधान आवताडे यांच्या कार्यालयासमोर जल्लोष केला. फटाके फोडून जल्लोषात सुप्रीम कोटांच्या निर्णयाचे स्वागत केले. भारतमाता की जय..... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो.....युती सरकारचा विजय असो... अश्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.
गेल्या १५ महिन्यात राज्यातील आघाडी सरकारला जमले नाही ते काम केवळ १५ दिवसात शिंदे फडणवीस सरकारने करून दाखवले. त्यांच्या योग्य नियोजनामुळेच सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकले आहे.आघाडी सरकार मात्र ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यात अपयशी ठरले आहे.- विवेक खिलारे , जिल्हाध्यक्ष, भाजप ओबीसी मोर्चा