गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल दरवाढ सतत चालू आहे. कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यायचा नाही, अशीच केंद्र सरकारची भूमिका आहे. महागाईच्या या भडक्यामुळे जनता हैराण झाली आहे. इंधन दरवाढीमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. त्यामुळे यापुढील काळात जनता मोदी सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे तालुकाप्रमुख गणेश इंगळे यांनी सांगितले.
यावेळी युवा सेनेचे दत्ता साळुंखे, अर्चना गाडेकर, वैशाली काळोखे, जयश्री इंगळे, सागर इंगळे, नरा इंगळे, रामचंद्र इंगळे, अर्जुन लावंड, बबन पराडे, राहुल महाडिक, ऋषिकेश पराडे, किरण पराडे, अभिजित पताळे, नवनाथ माने, तात्या पराडे, भीमराव भोई, पिंटू भोई, काका भोई, सोमा भोई, आप्पा भोई, ओम गायकवाड, सिद्धू गायकवाड, संतोष भोई, तुषार भोई, अमित भोई, माधव भोई, बालाजी भोई, शंकर भोई आदी उपस्थित होते.