सोलापूर : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता व उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई, पुण्याहून गोरखपूर व मंडुआडीहपर्यंत साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ७ एप्रिलपासून या गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्यासोलापूर मंडलाने दिली आहे.
पुणे ते गोरखपूरदरम्यान ७ एप्रिल ते ३० जून या कालावधीत दर रविवारी विशेष गाडी सोडली जाईल. ही गाडी सायंकाळी ७.५५ वाजता पुणे स्थानकातून सुटून तिसºया दिवशी पहाटे ४.३० वाजता गोरखपूरमध्ये पोहोचेल. तर प्रत्येक मंगळवारी सकाळी ७.२५ वाजता गोरखपूर येथून सुटून दुसºया दिवशी सायंकाळी पाच वाजता पुण्यात दाखल होईल. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण २६ फेºया होतील. या गाडीला १२ स्लीपर क्लास, ३ जनरल, २ ब्रेकयान असे एकूण १७ डबे असणार आहेत. ही गाडी पुणे-दौंड-अहमदनगर-बेलापूर-कोपरगाव-मनमाड-भुसावळ-खंडवा-इटारसी-भोपाल-बीना-झांशी-ओराई-कानपूर-बाराबंकी-गोंडा-बस्ती-गोरखपूर असे धावणार आहे.
पुणे ते मंडुआडीह ही विशेष गाडी ११ एप्रिल ते २७ जूनदरम्यान प्रत्येक गुरुवारी पुण्यातून सकाळी ९.३० वाजता सुटेल. तर तिसºया दिवशी पहाटे ३.२५ वाजता मंडुआडीह येथे पोहोचेल. तेथून प्रत्येक शनिवारी पहाटे ४.४५ वाजता सुटून दुसºया दिवशी दुपारी १२ वाजता पुणे स्थानकात येईल. या गाडीला १२ स्लीपर, ३ जनरल, २ ब्रेकयान असे १७ डबे असणार आहेत़ ही गाडी पुणे-दौंड-अहमदनगर-बेलापूर-कोपरगाव-मनमाड- भुसावळ- खंडवा-इटारसी-जबलपूर- कटनी- सतना-माणिकपूर-इलाहाबाद-ज्ञानपूर-मंडूआडीह अशी धावणार आहे़ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२ एप्रिल ते ५ जुलैदरम्यान प्रत्येक सोमवारी पहाटे ५.१० वाजता गोरखपूरसाठी विशेष गाडी सोडली जाईल. ही गाडी दुसºया दिवशी दुपारी १२.१० वाजता गोरखपूर स्थानकात पोहोचेल. तर प्रत्येक शनिवारी गोरखपूर येथून दुपारी २.४० वा. निघून दुसºया दिवशी ८.२५ वाजता पुण्यात पोहोचेल.
मुंबई-मंडुआडीह गाडी १७ एप्रिल ते ३ जुलैदरम्यान धावेल. ही गाडी दुपारी १२.४५ वाजता निघून दुसºया दिवशी पहाटे ४.४५ वाजता मंडुआडीह स्थानकात दाखल होईल. तिथून सकाळी ६.३० वाजता निघून दुसºया दिवशी ७.३० वाजता मुंबईत पोहोचेल.
विशेष शुल्क... विशेष गाडी- मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्टीत गाडी क्रमांक ०६०५१/०६०५२ चेन्नई सेंट्रल - अहमदनगर जंक्शन-चेन्नई सेंट्रल विशेष गाडी धावणार आहे़ या गाडीतून प्रवास करणाºया प्रत्येक प्रवाशांना विशेष शुल्क आकारले जाणार आहे़ ही गाडी चेन्नई सेंट्रल-पेनम्बुर-अरक्कोनम-रेनिगुंटा-कोडूरू-राजमपेटा-कडप्पा-येर्रगुन्तला-ताडपत्री-गोटे-गुंतकल जंक्शन-अदोनी-मंत्रालयम रोड अशी गाडी धावणार आहे.
कुर्डूवाडी-मिरज विभागातील गेट क्रमांक ६२ कायमस्वरूपी बंद- मध्य रेल्वे, सोलापूर विभागावरील कुर्डूवाडी-मिरज सेक्शनदरम्यान रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक ६२ हे २४ मार्चपासून कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे़ तरी नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करून वाहतूक करावी, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे़