सुजल पाटील
सोलापूर : कोविड-१९ विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू झाल्याने देश जणू काही थांबला आहे. या लॉकडाऊनच्या कठीण काळात भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वे विभागाने महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात मालवाहतुक गाड्या चालविल्या़ या वाहतुकीतून मध्य रेल्वेला ३०९.७४ कोटी रूपयाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव, संसर्ग होऊ नये यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गर्दीच होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ मेपर्यंत देशभरात संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूपासून कोणत्याही व्यक्तीची अडचण होऊ नये, यासाठी शासनाच्या वतीने योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान, लोकांची गरज भागविण्यासाठी व जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेने मालवाहतूक गाड्या सुरूच ठेवल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळातही अन्नधान्य आणि अत्यावश्यक वस्तू देशभरात उपलब्ध राहतील याची खबरदारी भारतीय रेल्वेने घेतली.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून २४ मार्च ते २५ एप्रिल या एक महिन्याच्या कालावधीत ७२ हजार ९९१ वॅगन लोड करून ५९ हजार ७३० वॅगन अन्नधान्यांची पोती देशाच्या कानाकोपºयात पोहचविल्या आहेत. मध्य रेल्वेने आंध्र प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू यासह आदी राज्यातून धान्यांची वाहतुक केली आहे़ रेल्वेगाडीत माल चढवणे, त्यांची वाहतूक आणि तो व्यवस्थित उतरवण्याचे काम लॉकडाऊनच्या काळातही जोमाने सुरू आहे.----------------------४९८ टन औषधांची वाहतुक...
मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर आणि भुसावळ विभागातून ४९८ टन औषधांची वाहतुक पार्सल गाड्यांच्या माध्यमातून केली आहे़ मध्य रेल्वेने देशभरात ३२३ पार्सल गाड्या चालविल्या़ अत्यावश्यक सेवेबरोबरच फळे, भाजीपाला, ई कॉमर्स वस्तू, पीपीई किट, औषधे, गोळ्या, सॅनिटायझर आदी वस्तू पार्सल गाड्यांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपºयात पोहचविल्या आहेत.------------------रेल्वे कर्मचाºयांना १२ तासांची ड्यूटी...
कोरोना या संक्रमण आजारामुळे देशभर लॉकडाउन पुकारण्यात आला आहे़ या काळात भारतीय रेल्वेच्यावतीने अन्नधान्य पुरवठयासाठी मालवाहतुक गाड्या अहोरात्र चालविण्यात येत आहेत़ लोकांच्या घरात अंधार पडू नये, अन्नधान्याचा तुटवडा भासू नये व आवश्यक सेवासुविधा मिळाव्यात, यासाठी रेल्वे अधिकारी, स्टेशन मास्टर, लोकोपायलट, साहाय्यक लोको पायलट, स्टेशन मास्तर, पॉइंट्स मॅन आपली सेवा देत आहेत़ या लोकांमुळे एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी माल पोहोचविणे शक्य होत आहे़ मध्य रेल्वे विभागात स्टेशन मास्तर आणि पॉइंट्स मॅन यांना १२-१२ तासांची ड्यूटी लावण्यात आली आहे.-----------------रेल्वे स्थानकाबाहेर विनाकारण गर्दी नको..
महाराष्ट्रातून परराज्यात जाणाºया नागरिकांसाठी स्थानिक नोडल अधिकाºयांमार्फत नावनोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ रेल्वेने बाहेरगावी जाण्याची व्यवस्था ज्यांची करण्यात आली आहे त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था शासनामार्फत करण्यात येणार आहे़ त्यामुळे जोपर्यंत संबंधितांकडून जोपर्यंत कळविले जाणार नाही तोपर्यंत कोणीही रेल्वे स्थानक परिसरात गर्दी करू नये, विनाकारण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये असेही आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.---------------भारतीय रेल्वेने लॉकडाउनच्या काळातही अन्नधान्यांचा रात्रंदिवस पुरवठा करून एक नवा इतिहास रचला आहे़ मध्य रेल्वेतील सर्वच विभागाने या मालवाहतुक गाड्या वेळेवर धावण्यासाठी प्रयत्न केले आहे़ गरजेच्या वेळी अन्नधान्यांचा पुरवठा करून रेल्वे प्रशासनानेही माणुसकीचे दर्शन घडविले आहे़ प्रवासी सेवेला प्राधान्य देणाºया रेल्वेने मालवाहतुकीलाही प्राधान्य दिले आहे.- प्रदीप हिरडे,वारिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर