सोलापूर : केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने गुरुवारी करमाळा तालुक्यातील मलवडी, घोटी, वरकुटे, नेरले व सालसे या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. शेतकऱ्यांकडून बाधित पिकांची माहिती घेतली.
केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर असून बुधवारी, १३ डिसेंबर रोजी पथक सोलापुरात दाखल झाले. गुरुवारी दुसऱ्या दिवशीही दुष्काळ गावांची तपासणी पथकाकडून सुरू आहे.
केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणीनुसार केंद्र शासनाला अहवाल सादर करणार आहे. या अहवालानुसार केंद्र सरकार मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने राज्य शासनाने माळशिरस, बार्शी, सांगोला, माढा व करमाळा या पाच तालुक्यात तसेच जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातील ४५ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केलेला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक दुष्काळ पाहणीसाठी सोलापूर दौऱ्यावर आहे.