ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. त्याची पाहणी मंगळवारी केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव यशपाल आणि रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी केली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, जिल्हा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ग्रामसेवक सचिन वसेकर, कृषी सहायक श्रीकांत इंगळे, कृषी सहायक गावडे यांच्यासह या भागातील शेतकरी धनाजी गावडे, कुंडलिक गावडे, कुंडलिक देशमुख, मनोज देशमुख, नितीन देशमुख, राहुल वाघमोडे, अमोल वाघमोडे, ज्ञानेश्वर देशमुख, सचिन देशमुख, सत्यवान देशमुख, समाधान गावडे, बबन देशमुख, पप्पू देशमुख आदी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर समस्या मांडल्या.
कलेक्टरनी दिली पथकास माहिती
केंद्रीय पथकाने सकाळीच लांबोटी येथील शेतकरी तात्या चंदनशिवे यांच्या उसाची पाहणी केली. कोळेगाव येथे देशमुख वस्तीवरील बंधाऱ्याची, शेतीची, विजेचे खांब, पडझड झालेल्या घरांची पाहणी करून माहिती घेतली. या ठिकाणी अतिपावसाने भोगावती, सीना आणि नागझरा नद्यांचे पाणी रात्री अचानक आले. यामुळे कुंडलिक देशमुख, निखिल देशमुख यांचे राहते घर वाहून गेले. आणखी चार-पाच घरांची पडझड झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पथकास सांगितले.
पेनूरच्या शेतात अजुनही चिखल
पेनूर येथील फुलाबाई माने आणि विजयाताई चव्हाण यांच्या मका पिकाचे नुकसान झाले आहे. येथे अजून शेतात चिखल असल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून दिले. पिकाचा पंचनामा झाला असून मदत त्वरित मिळेल, अशी माहिती पथकाला देण्यात आली. भारत सलगर यांच्या दीड एकर केळीच्या बागेचे नुकसान झाले आहे. पथकाने प्रत्यक्ष केळीच्या बागेत जाऊन माहिती घेतली.
----
फोटो: मोहोळ तालुक्यातील नुकसान झालेल्या परिसराची पाहणी करताना केंद्रीय पथक आणि शेतकरी.
===Photopath===
221220\22sol_3_22122020_4.jpg
===Caption===
फोटो: मोहोळ तालुक्यातील नुकसान झालेल्या परिसराची पाहणी करताना केंद्रीय पथक आणि शेतकरी.