शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

सीईओ श्वेता सिंघल नैमित्तिक रजेवर...

By admin | Published: June 21, 2014 1:15 AM

जिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांच्या मागणीमुळे नव्हे तर स्वत:हून मागणी केली

सोलापूर: ग्रामविकास खात्याने मंजुरी दिल्यानेच जिल्हा परिषदेच्या सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) श्वेता सिंघल या १२ जूनपासून नैमित्तिक रजेवर गेल्या आहेत. जि. प. पदाधिकाऱ्यांच्या मागणीमुळे त्या रजेवर गेल्या नाही तर त्यांनी स्वत: मागणी करुन रजा घेतली आहे. तसा उल्लेख विभागीय आयुक्तांच्या आदेशात आहे.सीईओ श्वेता सिंघल यांनी ५ जून रोजी दिलेल्या अर्जात १२ जूनपासून रजा मंजूर करावी, असे म्हटले असल्याचे जि. प.च्या पत्रात म्हटले आहे. सिंघल यांनी ५ जून रोजी विभागीय आयुक्तांकडे प्रसूती रजेसाठी अर्ज दिला होता. त्यात त्यांनी केलेल्या मागणीनुसारच १२ जून रोजीपासून रजा मंजूर करुन विभागीय आयुक्तांकडे अंमलबजावणीसाठी पत्र पाठविले होते. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सिंघल या रजेवर गेल्याने त्यांचा पदभार मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे देण्याचा आदेश काढला होता. श्वेता सिंघल यांना रजेवर पाठवून त्यांचा पदभार मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे द्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार गुडेवार यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. मात्र श्वेता सिंघल यांनी ५ जून रोजीच विभागीय आयुक्तांकडे विनंती अर्जाद्वारे देय असलेली प्रसुती रजा १२ जूनपासून मंजूर करण्याची विनंती केली होती. त्यानुसार नियमाप्रमाणे त्यांची रजा मंजूर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशात असा कुठेही उल्लेख नाही की जि.प. पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार सिंघल त्यांचा पदभार काढला. सिंघल यांनी स्वत:हूनच नैमत्तिक रजा घेतली आहे असल्याचे आदेशात म्हटले आहे. -------------------------