सोलापूर : शेतकºयांचे पैसे न देणाºया, बाजार समितीचा कर थकविणाºया तसेच गाळा पोटभाडेकरुंना दिल्याप्रकरणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द केलेल्या परवानाधारकांपैकी २० व्यापाºयांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अपील केले आहे. यावर आतापर्यंत चार सुनावण्या झाल्या आहेत.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकांनी शेतमालाची विक्री करून देखील शेतकºयांचे पैसे न देणाºया, बाजार समितीचा कर थकविणाºया तसेच स्वत:च्या नावावरील गाळा पोटभाडेकरुंना दिल्याप्रकरणी धाडसाने व्यापाºयांचे परवाने रद्द केले होते. अनेक व्यापाºयांना अशा प्रकारची रक्कम थकविल्याप्रकरणी नोटिसा दिल्या होत्या.
नोटिसा मिळाल्यानंतर अनेक व्यापाºयांनी पैसे भरुन परवाना नियमित ठेवला होता; मात्र २३ व्यापाºयांनी नोटीस मिळाल्यानंतरही दाद दिली नसल्याने त्यांचे परवाने रद्द केले होते. त्यानंतर या व्यापाºयांपैकी २० व्यापाºयांनी जिल्हा उपनिबंधकाकडे अपील दाखल केले आहे. यावर जिल्हा उपनिबंधकांनी चारवेळा सुनावणी घेतली असून अपील दाखल केलेल्या सर्व व्यापाºयांनी म्हणणे सादर केले असले तरी बाजार समितीने सर्वांच्या अपिलावर म्हणणे दिले नसल्याचे सांगण्यात आले.
यांनी केले अपील...- तुकाराम भा. पाटील, ज्ञानेश्वर भा. पाटील, अमन जि. कल्याणी, जिलानी इ. कल्याणी, अनिल ब. हेबळे,अविनाश रे. पाटील, मुद्दसर कल्याणी, इम्तीयाज कल्याणी, उजेफ कल्याणी, रतिकांत पाटील, अविनाश रेवणसिद्ध पाटील, नूरअहमद बागवान,योगीराज सि. हिरेमठ, सलीम मैंदर्गीकर, गंगाधर विभुते, विनय दुलंगे, संजय साखरे, नारायण तापडिया, राहुल पंपतवाल आदींनी बाजार समिती सचिव प्रशासकांनी दिलेल्या निर्णयाविरोधात जिल्हा उपनिबंधकाकडे अपील दाखल केले आहे.
सोलापूर बाजार समितीने परवाना रद्द केलेल्यापैकी काही व्यापाºयांनी आमच्याकडे अपील केले आहे. याची सुनावणी सुरू असून व्यापाºयांनी म्हणणेही दिले आहे. बाजार समितीचे म्हणणे आलेले नाही. परवाना रद्द करण्याची कारणे वेगवेगळी आहेत.- अविनाश देशमुख, जिल्हा उपनिबंधक