माढा येथे माढेश्वरी अर्बन बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. प्रास्ताविकात बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत यांनी कोरोना संकटाच्या काळातही सभासद व खातेदारांना अखंडपणे चांगली सेवा दिल्यामुळे शेअर्स व ठेवींमध्ये वाढ झाल्याचे सांगितले.
आ. शिंदे म्हणाले, बँकेच्या ज्या सभासदांनी एक किंवा दोन मुलीवर कुटुंब नियोजन केलेले आहे, पात्र सभासदांनी बँकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार बबनराव शिंदे व संचालकपदी विक्रमसिंह शिंदे यांची निवड झाल्याने बँकेतर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सभापती विक्रमसिंह शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, माढेश्वरी अर्बन बँकेचे संचालक गणेश काशीद, प्रा. गोरख देशमुख, राजेंद्र पाटील, उदय माने, नानासाहेब शेंडे, राहुल कुलकर्णी, दादा सुरवसे, नागनाथ जवळगे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे, सहव्यवस्थापक नंदकुमार दुड्डम, सुनील रावडे, रामचंद्र भांगे, प्रदीप चौगुले, धनंजय शहाणे, दिगंबर इंगळे, भारत पालकर, बाळासाहेब चव्हाण यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आभार संचालक डॉ. गोरख देशमुख यांनी मानले.
फोटो
१५माढेश्वरी बँक
ओळी: माढेश्वरी बँकेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन आ. बबनराव शिंदे.