पंचायत समितीचे सदस्य जालिंदर लांडे यांना रोखण्यासाठी सर्वपक्षीय विरोधक एकत्र आले होते, मात्र लांडे यांच्याकडे पुन्हा सत्ता आल्याने ते पाचव्यांदा कुरुलचे कारभारी झाले आहेत. सरपंच व उपसरपंच निवडीत लांडे गटाकडून चंद्रकला पाटील यांनी सरपंच पदासाठी तर उपसरपंच पदासाठी पांडुरंग जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी गटाकडून सरपंच पदासाठी कविता निकम व उपसरपंच पदासाठी गहिनीनाथ जाधव यांनी अर्ज दाखल केला. निवडीपूर्वीच विरोधी गटातील सहा सदस्यांनी गुप्त मतदानाची लेखी मागणी केली. त्यानुसार निवडणूक अधिकारी काटकर यांनी मतदान प्रक्रिया राबविली. यामध्ये लांडे गटाच्या चंद्रकला पाटील यांना ११ मते पडली तर कविता निकम यांना ६ मते पडली. उपसरपंच निवडीत पांडुरंग जाधव यांना १२ मते तर गहिनीनाथ जाधव यांना ५ मते पडली. त्यामुळे चंद्रकला पाटील यांची सरपंच तर पांडुरंग जाधव यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. आर. काटकर यांनी जाहीर केले. त्यांना ग्रामविकास अधिकारी जे.एस. भोसले यांनी सहकार्य केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लांडे, सीताराम लांडे, तानाजी गायकवाड, गहिनीनाथ जाधव, प्रकाश जाधव, सुभाष माळी, मोहिनी घोडके, शीला माने, अंजली गायकवाड, रोहिणी तगवाले, रुक्मिणी माळी, कल्पना जाधव, संगीता शिंदे, कविता निकम, शन्नू मुलानी या सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
वेळी पं. स. सदस्य जालिंदर लांडे, कमल लांडे, शैला पाटील, अमर लांडे, सुरेश जाधव, राजेंद्र लांडे, अंकुश जाधव, समाधान वाघमोडे, विष्णुपंत जाधव, शहाजी पाटील, टी. डी. पाटील, विजय भालेराव, माणिक पाटील, भारत माने, उमेश घोडके, समाधान गायकवाड, हरिभाऊ आवताडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो
२८ कुरुल
कुरुलच्या सरपंच, उपसरपंच निवडीनंतर जल्लोश करताना पार्टी प्रमुख जालिंदर लांडे यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामस्थ.