यापूर्वीच्या आदेशात शेतकऱ्यांना भरावा लागणारा विमा हप्ता एकूण विमा हप्त्याच्या पाच टक्के होता उर्वरित हप्त्यांमध्ये केंद्र सरकार ५० टक्के आणि राज्य सरकार ५० टक्के अशी विभागणी होती परंतु मागील वर्षापासून केंद्र सरकारने स्वतःचा हिस्सा १२.५% इतका कमी केला त्यामुळे उर्वरित हप्त्याच्या रकमेचा बोजा शेतकरी आणि राज्य सरकारवर पडणार आहे. फळपीक विमा हप्ता दर ३० टक्क्यांपर्यंत असेल तर ५ टक्के शेतकरी, १२.५ टक्के केंद्र आणि १२.५ टक्के राज्य शासन अशी विभागणी करण्यात आली आहे.
----
फळपीक विम्याचे नवीन निकष
१ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या काळात तापमान सलग तीन दिवस ८ डिग्री सेल्सिअसच्या खाली राहिल्यास शेतकऱ्यांना २६,५०० रुपये नुकसान भरपाई.
१ एप्रिल ते ३० एप्रिल या काळात सलग पाच दिवस तापमान ४२ डिग्री सेल्सिअसच्या पुढे राहिल्यास ४३,५०० रुपये विमा संरक्षण.
१ मार्च ते ३१ जुलै दरम्यान ४० किमीपेक्षा अधिक हवा वाहत असेल तर ७०,००० रुपये भरपाई
१ जानेवारी ते ३० एप्रिल दरम्यान गारपीट झाल्यास ४३,५०० रुपये असे एकूण १ लाख ८६ हजार ६६७ रुपये विमा संरक्षण मिळणार आहे.
-------
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर सरकारने पूर्वीचे जुने निकष लावले.याचा फायदा निश्चित होईल; मात्र गारपीट , वारा आदींची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळवणे आवश्यक आहे. - रवींद्र माने, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर