महिलांकडे पाहण्याची मानसिकता बदला; प्रणिती शिंदेंची संभाजी भिडे गुरूजींवर टीका

By Appasaheb.patil | Published: November 3, 2022 04:50 PM2022-11-03T16:50:20+5:302022-11-03T16:50:26+5:30

काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची भिडे गुरूजींवर टीका

Change the mindset towards women; Praniti Shinde's criticism of Sambhaji Bhide Guruji | महिलांकडे पाहण्याची मानसिकता बदला; प्रणिती शिंदेंची संभाजी भिडे गुरूजींवर टीका

महिलांकडे पाहण्याची मानसिकता बदला; प्रणिती शिंदेंची संभाजी भिडे गुरूजींवर टीका

googlenewsNext

साेलापूर : महिलांचे काम आणि त्यांचे कर्तृत्व बघा. केवळ त्यांच्या चेहऱ्यांकडे बघून भेदभाव करण्याची मानसिकता बदला, अशी टीका काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर केली.

काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसंदर्भातील सोलापुरातील तयारी संदर्भातील आढावा व पुढच्या तयारीसंदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, सुरेश हसापुरे, प्रकाश यलगुलवार, चेतन नरोटे आदी मान्यवर उपस्थित होते. 

मुंबईतील एका महिला पत्रकाराने संभाजी भिडे यांना प्रश्न विचारला हाेता. या प्रश्नाचे उत्तर देण्याएेवजी त्यांनी आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बाेलताे, असा सल्ला दिला हाेता. आमदार प्रणिती शिंदे गुरुवारी भारत जाेडाे यात्रेतील सहभागाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना भिडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. आमदार शिंदे म्हणाल्या, महिलांना ऑब्जेटिव्ह म्हणून बघणे बंद करा. अमूक गाेष्ट करा म्हणून सांगणारे हे काेण आहेत? भाजपचे लोक आम्हाला देश प्रेमाबद्दल सांगतात. आमचे देशप्रेम हृदयात आहे. आम्हाला दाखवायची गरज नाही. भाजपच्या लाेकांनी महिलांबद्दलची मानसिकता बदलावी. हे लाेक  महिलांचे काम आणि कर्तृत्व बघत नाही. केवळ त्यांच्या चेहऱ्यावर बघून विधाने करतात. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत.

Web Title: Change the mindset towards women; Praniti Shinde's criticism of Sambhaji Bhide Guruji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.