पंढरपूर : कार्तिकी यात्रा कालावधीत श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीकडून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महिला भाविकांसाठी चंद्रभागा वाळवंटात स्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी १० चेंजिंग रूमची उभारणी करण्यात येणार आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
महिला भाविकांना कपडे बदलण्याची सोय करण्याच्या दृष्टीने चंद्रभागा नदीपात्रात चेंजिंग रूम बसविण्यात आलेल्या आहेत. याशिवाय, महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चेंजिंग रूमजवळ २४ तास महिला सुरक्षा कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
४ ठिकाणी हिरकणी कक्षाची उभारणी
- कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी श्रीसंत ज्ञानेश्वर दर्शनमंडप, पत्राशेड व श्रीविठ्ठल सभामंडप येथे ४ ठिकाणी हिरकणी कक्षाची (स्तनपान गृह) उभारणी करण्यात आली आहे.
- याशिवाय, श्रींच्या दर्शन रांगेत महिला भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त मंदिर समितीमार्फत महिला स्वयंसेवक नियुक्त करण्यात आलेले आहेत.