शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

सोलापुरातील गुदमरलेले चौक; कुंभारवेसचा लेंडकी नाला बनला जीपचालकांचा थांबा; ग्राहक करायला आले ‘बाजार’; परंतु होऊन गेले ‘बेजार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 12:48 PM

रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : प्रमुख बाजारपेठ म्हणून ग्रामीण भागातही परिचित असलेल्या कुंभारवेस चौकातील लेंडकी नाल्याला जीपचालकाने थांबाच बनविला आहे. ...

ठळक मुद्देया कुंभारवेस चौक परिसरात किराणा, भुसार, डाळ, गूळ, स्टेशनरी आणि कटलरी, तेल आदी वस्तू होलसेल दरात मिळतातआठवडा बाजारदिवशी होलसेल मालाच्या खरेदीसाठी आलेले व्यापारी, ग्राहक अक्षरश: बेजारशहरालगतच्या गावांमधून छोटे-मोठे किराणा व्यापाºयांसह घरगुती ग्राहक इथूनच माल खरेदी

रेवणसिद्ध जवळेकर

सोलापूर : प्रमुख बाजारपेठ म्हणून ग्रामीण भागातही परिचित असलेल्या कुंभारवेस चौकातील लेंडकी नाल्याला जीपचालकाने थांबाच बनविला आहे. त्यातच मंगळवारी आठवडा बाजारदिवशी होलसेल मालाच्या खरेदीसाठी आलेले व्यापारी, ग्राहक अक्षरश: बेजार झाले आहेत. इथे कुठेच पार्किंग नाही... आमने-सामने आलेली वाहने, वाहतूक सुरळित करण्यासाठी जागेवर नसलेले वाहतूक पोलीस या आणि अन्य कारणांमुळे कुंभारवेस चौकात श्वास कोंडतोय, हे प्रखर चित्र ‘लोकमत’चमूच्या टीमने कॅमेºयात कैद केले.

पूर्वी ज्या विजापूर वेस, बाळीवेस, तुळजापूरवेस आणि कुंभार वेस या चार चौकाच्या आतच सोलापूर शहर होते. आज या कुंभारवेस चौक परिसरात किराणा, भुसार, डाळ, गूळ, स्टेशनरी आणि कटलरी, तेल आदी वस्तू होलसेल दरात मिळतात. त्यामुळे शहरालगतच्या गावांमधून छोटे-मोठे किराणा व्यापाºयांसह घरगुती ग्राहक इथूनच माल खरेदी करतात. कुंभार वेसच्या हाकेच्या अंतरावर भुसार गल्ली, क्षत्रिय गल्ली, जुना अडत बाजार आहे.

मंगळवारी भरणारा आठवडा बाजारही याच चौकाला लागून आहे. जुना अडत बाजार म्हणजे मार्केट यार्ड हैदराबाद रोडवर स्थलांतरीत झाला तरी नव्याने काही दुकाने थाटली गेली. हॉस्पिटल, मंदिरे, तीर्थक्षेत्रे, शाळा, क्लासेस, मंगल कार्यालयांसह लेंडकी नाल्यावर महापालिकेचे मोठे शॉपिंग सेंटर आहे. याच लेंडकी नाल्यावरचा रस्ता अरुंद आहे. अरुंद रस्ता असतानाही बोरामणी, संगदरी, मुस्ती, तांदुळवाडी, कासेगाव आदी गावांकडे प्रवाशांना घेऊन जाणाºया जीपगाड्या थांबलेल्या असतात. त्यामुळे चौकातील जेणेकरुन लेंडकी नाल्यावर वाहतूक ठप्प झाली की वाहनेही जागीच थांबतात. मंगळवारी आठवडा बाजार आणि दसरा, दिवाळीला तर हे चित्र अंगावर काटे आणणारे असतात.

सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने व्यापारी असुरक्षित- कुंभारवेस चौक हा नेहमी गजबजलेला असतो. चौक कधीच मोकळा श्वास घेत नाही. रात्रीच्या वेळी काही व्यापाºयांचे धान्य, साहित्य दुकानाबाहेरच पडलेले असतात. आजपर्यंत अनेक चोºया झाल्या. या चोºया कधीच उघडकीस आल्या नाहीत. या भागातील नगरसेवकांनी, आमदारांनी आपल्या फंडातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असा सूर व्यापाºयांमधून ऐकावयास मिळत होता. 

कुंभारवेस चौकात नेहमीच ट्रॅफिक जाम असते. कायमस्वरुपी एखाद्या वाहतूक पोलिसाची नियुक्ती केली पाहिजे. काही व्यापाºयांनी केलेले अतिक्रमण हटविल्यास हा कुंभार वेस चौक मोकळा श्वास घेणार आहे. -महादेव तोग्गी,अध्यक्ष- कुंभारवेस व्यापारी असोसिएशन.

कुंभारवेस चौकात सीसीटीव्ही बसविण्याबाबत असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. व्यापाºयांनी आर्थिक मदत करावी. शिवाय नगरसेवक, आमदारांनी आपल्या फंडातून निधी उपलब्ध करुन द्यावा.-सुभाष कलादगीकार्याध्यक्ष- कुंभारवेस व्यापारी असोसिएशन.

कुंभारवेसच्या लेंडकी नाल्यावर नेहमीच वाहतूक ठप्प असते. ग्राहकांची वाहने सोडून द्या, दुकानांच्या मालकांना नीट वाहने लावता येत नाहीत. जीपचालकांच्या तावडीतून लेंडकी नाल्याची सुटका होणे गरजेचे आहे.-श्रीनिवास पोतू, व्यापारी.

कुंभारवेस ते चाटला चौकापर्यंतच्या मार्गावर व्यापार वाढला आहे. वाढती दुकाने, वाहनांची रेलचेल पाहता परिसरातील नागरिकांना तारेवरची कसरत करत वाट काढावी लागते. वाहतूक शाखेचे योग्य नियोजन करावे.-शिवमूर्ती स्वन्ने, रहिवासी. 

व्यापाºयांच्या सुरक्षेसाठी असोसिएशनच्कुंभारवेस आणि परिसरातील व्यापाºयांच्या सुरक्षेसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी कुंभारवेस व्यापारी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी महादेव तोग्गी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सुभाष कलादगी, संतोष उदगिरी आदी व्यापाºयांना घेऊन असोसिएशन आपली पुढील व्यूहरचना आखत आहे. व्यापाºयांच्या आर्थिक मदतीतून आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे महादेव तोग्गी यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस