चपळगाव : अक्कलकोट तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या चपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामदैवत मल्लिकार्जुन ग्रामविकास पॅनलचे १३ पैकी १२ उमेदवार निवडून आले. उद्योजक उमेश पाटील, सिध्दाराम भंडारकवठे व बसवराज बाणेगांव यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विरोधकांचा पराभव केला. ग्रामपंचायतीच्या तेरा जागांपैकी यापूर्वीच पाटील-बाणेगांव-भंडारकवठे-पटेल गटाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नऊ जागा जिंकत पाटील-भंडारकवठे-बाणेगाव विरोधक असलेल्या शाकीर पटेल, महादेव वाले व संजय बाणेगांव यांच्या पॅनलने पराभवाचा धक्का दिला. अपक्ष एक उमेदवार निवडून आला आहे. निवडीनंतर ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी घरोघरी जात मतदारांचे आभार मानले.
ग्रामविकास पॅनलच्या विजयासाठी अप्पासाहेब पाटील, महेश पाटील, रियाज पटेल, अभिजित पाटील, पांडुरंग चव्हाण, अंबणप्पा भंगे, प्रभाकर हंजगे, डाॅ. काशिनाथ उटगे, श्रावण गजधाने, नितीन शिवशरण, अर्जुन आगावणे, सुरेश नारायणकर यांनी परिश्रम घेतले.
---
निवडून आलेले सदस्य
वाॅर्ड क्रमांक एकमधून सुवर्णा कोळी, वर्षा भंडारकवठे, तर वार्ड क्रमांक दोनमधून वंदना कांबळे, रेश्मा तांबोळी, अपर्णा बाणेगाव विजयी झाल्या. वाॅर्ड क्रमांक तीनमधून उमेश पाटील, वाॅर्ड क्रमांक चारमधून चित्रकला कांबळे, स्वामीनाथ जाधव (अपक्ष), वाॅर्ड क्रमांक पाचमधून गंगाबाई वाले, श्रावण गजधाने विजयी झाले.