महावितरण कंपनीच्या उपविभागाचे सहा. अभियंता बाळासाहेब खरात, त्यांचे सहकारी कर्मचारी व पंचासह महुद उपविभागातील विविध गावांना भेटी देऊन घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांच्या वीजजोडणीची तपासणी केली. यावेळी महुद अंतर्गत ढाळेवाडी येथील सीताराम नारायण ढाळे यांनी २४ हजार ४९० रुपयांची ६७५ युनिट, मरयानी नागप्पा मुतगेकर यांनी ५१ हजार ८०० रुपयांची ३५६९ युनिट महुद अंतर्गत अकलूज चौकातील डॉ. प्रशांत उत्तमराव सावंत यांनी २६ हजार ५६० रुपयांची १७६९ युनिट, सुरेश उत्तरेश्वर शिंदे (अकलूज रोड) यांनी १ लाख ६३ हजार ७५० रुपयांची ५९३१ युनिट तर लोटेवाडी येथील प्रकाश गोरख लवटे यांनी १ लाख ९ हजार ९०० रुपयांची ६७१४ युनिट, लहू राजाराम सरगर यांनी डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग प्रेससाठी १ लाख २२ हजार ५७० रुपयांची ४००७ युनिट अशा व्यावसायिक व घरगुती सहा ग्राहकांनी ४ लाख ९९ हजार ७० रुपयांची तब्बल २२,६६५ युनिटची वीज चोरी केली आहे. दरम्यान, वीज चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त करून महुद येथील शाखेत जमा केल्याची माहिती सहा. अभियंता बाळासाहेब खरात यांनी दिली.
कोट :::::::::::::::::::::::::
महावितरणच्या घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक ग्राहक विजेची चोरी करताना मिळून आल्यास संबंधितांवर पोलिसात गुन्हे दाखल केले जातील. दरम्यान, वीज ग्राहकांनी आपल्याकडील चालू बिलासह थकबाकी भरून महावितरण कंपनीस सहकार्य करावे.
- आनंदा पवार, उपविभागीय अभियंता