बालाजी चव्हाण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र येथे शेती विभागाकडे मजूर म्हणून काम करतात. त्यांच्याकडे चारा उत्पादन करणे, शेतातील चाऱ्यास पाणी देणे, विहिरीवरील पाण्याच्या मोटार चालू-बंद करणे यासह देखभाल करण्याचे काम पाहतात. दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ च्या सुमारास शेतातील चाऱ्यास पाणी देण्यासाठी गट नं. ६३ मधील विहिरीवरील पाणबुडी मोटार चालू करून चाऱ्यास पाणी दिल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास मोटार बंद केली. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ च्या सुमारास बालाजी चव्हाण सदरची मोटार चालू करण्यासाठी गेले असता स्टार्टर, ऑटोसह केबल व विहिरीतील पाणबुडी मोटार चोरीला गेल्याचे उघडकीस आले. दरम्यान, ते सायंकाळी ५.३० च्या सुमारास घरी जात असताना प्रक्षेत्राच्या बाजूस नीरा उजवा कालव्याच्या साइड पट्टीवर दुचाकी उभी होती. तर महामंडळाच्या विहिरीजवळ तीन अज्ञात इसम उभे असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता तिघांपैकी एक जण पळून गेला. प्रक्षेत्रातील मजुरांनी संशयावरून त्या दोघांना पकडून ठेवल्याने मोटार चोरीची घटना उघडकीस आली.
चोरीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:27 AM