सोलापूर - नव्या वर्षाच्या पहाटे साडेतीनच्या सुमारास अशोक चौक परिसरात असलेल्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर असलेल्या हेअर अफेअर या सलूनचे दुकान चोरट्यांनी फोडून ३८ हजाराची रोख रक्कम व एक मोबाईल चोरून नेला आहे. याबाबतची माहिती सोलापूर शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज मिळविला आहे.
दरम्यान, दोन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून लक्षात येते. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिस दलाकडून तपास करण्यात येत आहे. लवकरच चोरटे जेरबंद होतील असा विश्वास पोलिसांनी सलून चालकांना दिला आहे.